डेव्हॉन कॉन्वेच्या नाबाद ९२ धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात बांगलादेशवर ६६ धावांनी दीमाखदार विजय मिळवला.

कॉन्वेने ५२ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांसह आपली खेळी साकारली आणि विल यंगच्या (५३) साथीने तिसऱ्या गड्यासाठी १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी उभारली. यंगने ट्वेन्टी-२० क्रि के टमधील पदार्पणीय सामन्यात २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण के ले. त्यामुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २१० धावा के ल्या. त्यानंतर बांगलादेशला प्रत्युत्तरात ८ बाद १४४ धावा करता आल्या. लेग-स्पिनर इश सोधीने २८ धावांत चार बळी घेतले. यापैकी तीन फलंदाजांचे त्रिफळे उडवले. कॉन्वेच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.