News Flash

हॉकी मालिकेत न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय

न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या महिलांच्या हॉकी कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ८-२ असा दणदणीत विजय नोंदविला.

| May 17, 2017 03:04 am

न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या महिलांच्या हॉकी कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ८-२ असा दणदणीत विजय नोंदविला.

धारदार आक्रमणाच्या जोरावर न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या महिलांच्या हॉकी कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ८-२ असा दणदणीत विजय नोंदविला. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ४-१ असा विजय मिळविला होता.

एकतर्फी झालेल्या या लढतीत सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला समंथा हॅरिसन हिने न्यूझीलंडचे खाते उघडले. सहाव्या मिनिटाला भारतास बरोबरी करण्याची संधी मिळाली होती. मात्र राणी हिने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या बाहेर गेला. १२ व्या मिनिटाला भारताच्या अनुपा बार्ला हिने मारलेला चेंडू न्यूझीलंडची गोलरक्षक ग्रेस ओ हॅन्लोन हिने शिताफीने अडविला. सामन्याच्या २१ व्या मिनिटाला स्टेसी मिचेलसन हिने न्यूझीलंडला २-० अशी आघाडी मिळवून दिली. २४ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा लाभ भारताला घेता आला नाही. पुन्हा स्टेसी हिने ३० व्या मिनिटाला आणखी एक गोल करीत न्यूझीलंडची बाजू भक्कम केली.

भारताला पहिला गोल करण्यात ४० व्या मिनिटाला यश मिळाले. लिलिमा मिंझ हिने पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करीत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ दोन मिनिटांनी स्टेसी हिने गोल करीत हॅटट्रिक नोंदविली आणि संघास ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला बार्ला हिने भारताचा दुसरा गोल नोंदवित सामन्यातील रंगत वाढविली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सातत्याने वेगवान चाली करीत भारताच्या बचाव फळीतील मर्यादा स्पष्ट केल्या. पिअर्स कर्स्टन (५२ वे मिनिट), दोएर मेडिसन (५६ वे मिनिट), समंथा हॅरिसन (५७ वे मिनिट) व स्टीफनी दिकिन्स (६० वे मिनिट) यांनी गोल करीत न्यूझीलंडला शानदार विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:04 am

Web Title: new zealand beat indian women hockey team in series opener
Next Stories
1 IPL 2017 Qualifier : जेतेपदासाठी अखेरची संधी
2 ललिता बाबर विवाहबद्ध
3 IPL2017 : पुणेरी पाऊल पडते पुढे, मुंबईला पराभूत करुन ‘फायनल’मध्ये प्रवेश
Just Now!
X