19 September 2020

News Flash

पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत न्यूझीलंडची इंग्लंडवर मात

हॅमीश रुदरफोर्ड आणि ब्रेंडान मॅक्युल्लम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत इंग्लंडवर ५ धावांनी मात केली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडतर्फे

| June 27, 2013 03:05 am

हॅमीश रुदरफोर्ड आणि ब्रेंडान मॅक्युल्लम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत इंग्लंडवर ५ धावांनी मात केली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडतर्फे सलामीवीर हॅमीश रुदरफोर्डने ३५ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावांची वेगवान खेळी केली. कर्णधार ब्रेंडान मॅक्युल्लमने ४८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा फटकावल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. रॉस टेलरने १९ चेंडूत ३२ तर टॉम लाथमने १९ चेंडूत २२ धावांच्या उपयुक्त खेळी केल्याने न्यूझीलंडने २०१ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडतर्फे ल्युक राइटने सर्वाधिक २ बळी टिपले. इंग्लंडला १९६ धावांचीच मजल मारता आली. ल्युक राइटने ३४ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी केली. अँडी हेल्सने ३९ तर बोपाराने नाबाद ३० धावा केल्या. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:05 am

Web Title: new zealand beats england by five runs in twenty20 cricket match
Next Stories
1 भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस
2 धोनी भारतीय क्रिकेटमध्ये चमत्कार घडवणारा खेळाडू- सौरभ गांगुली
3 सेरेनाची विजयी नांदी
Just Now!
X