फलंदाजीच्या आक्रमक शैलीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा न्यूझीलंडचा तडफदार फलंदाज आणि कर्णधार ब्रेण्डन मॅक्क्युलमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम कसोटी मालिका खेळणार असल्याचे ३४ वर्षीय मॅक्क्युलमने जाहीर केले आहे. या कसोटी मालिकेत मॅक्क्युलम आपल्या कारकीर्दीतील कसोटी सामन्यांचे शतक गाठणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी संघ निवडीची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि माझ्यामुळे दुसऱया कोणत्याही खेळाडूची संधी वाया जाऊ नये म्हणून निवृत्तीची हीच योग्य वेळ ठरेल, असे मला वाटते त्यामुळेच निवृत्ती जाहीर करणे गरजेचे वाटल्याचे मॅक्क्युलमने म्हटले आहे.
मॅक्क्युलम २० फेब्रुवारीला ख्राईस्टचर्च येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळणार आहे. दरम्यान, ब्रेण्डन मॅक्क्युलमच्या आक्रमक नेतृत्त्वे शैलीमुळे संघाला नवे रुप प्राप्त झाले होते. २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत मॅक्क्युलमच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडच्या संघाचे उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.