News Flash

टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची घोषणा, वेळापत्रकही जाहीर

५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांचा कार्यक्रम

(संग्रहित फोटो)

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने २०१९-२० वर्षाच्या उर्वरित महिन्यांसाठी आपलं वेळापत्रक जाहीर केलं आहे. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर न्यूझीलंड घरच्या मैदानात इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत दोन हात करणार आहे. यापैकी भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं असून या दौऱ्यात दोन्ही संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियाचं विश्वचषकानंतरच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

जाणून घ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिला टी-२० सामना – २४ जानेवारी (ऑकलंड)

दुसरा टी-२० सामना – २६ जानेवारी (ऑकलंड)

तिसरा टी-२० सामना – २९ जानेवारी (हॅमिल्टन)

चौथा टी-२० सामना – ३१ जानेवारी (हॅमिल्टन)

पाचवा टी-२० सामना – २ फेब्रुवारी (माऊंट मोंगगॉन्वी)
——————————————————————————

पहिला वन-डे सामना – ५ फेब्रुवारी (हॅमिल्टन)

दुसरा वन-डे सामना – ८ फेब्रुवारी (ऑकलंड)

तिसरा वन-डे सामना – ११ फेब्रुवारी (टॉरंगा)
——————————————————————————-

पहिला कसोटी सामना – २१ ते २५ फेब्रुवारी (वेलिंग्टन)

दुसरा कसोटी सामना – २९ फेब्रुवारी ते ४ मार्च (ख्राईस्टचर्च)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2019 3:41 pm

Web Title: new zealand cricket announce dates for india series
Next Stories
1 World Cup 2019 : अफगाणिस्तानला धक्का, अहमद शेहजाद दुखापतीमुळे संघाबाहेर
2 World Cup 2019 : धोनी कॉम्प्युटरपेक्षाही वेगवान – शोएब अख्तर
3 धोनीचं कौतुक, पण आयसीसीच्या नियमाचा आदर केला पाहिजे – बायचुंग भुतिया
Just Now!
X