11 August 2020

News Flash

न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून ब्रेंडन मॅक्क्युलमची पाठराखण

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमवर करण्यात आलेल्या मॅच-फिक्सिंगच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगून न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने त्याची पाठराखण केली आहे.

| May 20, 2014 12:48 pm

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमवर करण्यात आलेल्या मॅच-फिक्सिंगच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगून न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने त्याची पाठराखण केली आहे.
मॅक्क्युलमवर २००८मध्ये मॅच-फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्यामुळे त्याची चौकशी करण्यात आली नाही. ब्रेंडन हा स्वच्छ प्रतिमेचा खेळाडू असून आयसीसीनेही त्याची चौकशी केलेली नाही, किंबहुना त्याची साक्षच अन्य आरोपींविरुद्ध पुरावा भक्कम करण्यासाठी उपयोगी ठरली आहे, असेही मंडळाने म्हटले आहे.
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक म्हणाला, ‘‘आयसीसीने याबाबत कडक कारवाई केल्यानंतर अशा घटना संपल्या असाव्यात, असा माझा अंदाज होता. मात्र पुन्हा अशा घटनांचे वृत्त येत असल्यामुळे मी खरोखरीच दु:खी झालो आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2014 12:48 pm

Web Title: new zealand cricket back captain brendon mccullum 100 after match fixing testimony leaked to british press
टॅग Brendon Mccullum
Next Stories
1 भारतीय हॉकीपटूंमध्ये सातत्याचा अभाव -डायर
2 महान एफ-वनपटू सर जॅक ब्राभम यांचे निधन
3 बीसीसीआयला वाचवण्यासाठी आदित्य वर्मा यांचे नरेंद्र मोदींना साकडे
Just Now!
X