भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्याची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळणार आहे. यामधील पहिल्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. जानेवारीमध्ये अनुष्का-विराटला अपत्यप्राप्ती होणार असल्याने तो डिसेंबरअखेरीसच ऑस्ट्रेलियातून प्रयाण करणार आहे. बीसीसीआयनं विराट कोहलीला पालकत्व रजा मंजूर केली आहे. आता विराट कोहलीनंतर आणखी एक खेळाडू पालकत्व रजेवर जाणार आहे. हा कोणी भारतीय खेळाडू नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पालकत्व रजेवर जाणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं याबाबत मंजूरी दिली आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन पहिल्यांदाज बाप होत आहे. त्यामुळे त्यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेत पत्नीसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यमसनच्या या निर्णयाचं नूझीलंड बोर्डानंही समर्थन केलं आहे. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना विल्यमसन म्हणाला की, डिसेंबरअखेर पत्नी मुलाला जन्म देऊ शकते. पहिल्या आपत्याच्या जन्मावेळी मला पत्नीसोबत राहायचं आहे. त्यामुळे मी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा विचार करत आहे.
हेमिल्टनमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विल्यमसनच्या द्विशतकी खेळीच्या बळावर विंडजचा एक डाव आणि १३४ धावांनी पराभव झाला. सामन्यानंतर बोलताना न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड म्हणाले की, न्यूझीलंड बोर्डानं विल्यमसनला पालकत्व रजा मंजूर केली आहे.
आणखी वाचा :
पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाला आठवला धोनी
भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…
पांड्या म्हणतो, “सामनावीरचा खरा मानकरी मी नाही, तर…”
रोहित-बुमराहशिवाय भारतानं टी-२० मालिका जिंकली, पाहा विराट कोहली काय म्हणाला…
विराट म्हणाला, त्या शॉटबद्दल मी एबीशी चर्चा करेन; अन् एबीने दिला ‘हा’ रिप्लाय
वसीम जाफरचा फ्री हीट… ‘गँग्स ऑफ वासेपूर स्टाइल’मध्ये इंग्लंडच्या खेळाडूला केलं ट्रोल
विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये कट झाले तीन केक; पाहा व्हिडीओ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 11:59 am