News Flash

न्यूझीलंडमध्येही रंगणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, मालिका खेळवण्यास सरकारची परवानगी

विंडीज आणि पाकिस्तानविरुद्ध खेळणार मालिका

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला स्थानिक सरकारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांचं आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे न्यूझीलंडचा संघ आता घरच्या मैदानावर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळणार आहे. सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंड क्रिकेट बोर्डाप्रमाणे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डही Bio Secure Bubble तयार करण्याच्या तयारीत आहे. सरकारी परवानगी मिळाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी दोन्ही बोर्डांसोबत चर्चा सुरु केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे.

दोन्ही बोर्डांसोबत अंतिम बोलणी झाल्यानंतर दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. आयसीसीने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार न्यूझीलंडचा संघ आपल्या देशात पाकिस्तान आणि विंडीजविरुद्ध कसोटी आणि टी-२० मालिका खेळणं अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 6:42 pm

Web Title: new zealand cricket gets green light to host west indies and pakistan psd 91
Next Stories
1 विराट-अनुष्कावरील ‘त्या’ वक्तव्यावर सुनील गावसकरांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
2 फ्रेंच खुली पात्रता टेनिस स्पर्धा : अंकिताचे आव्हान संपुष्टात
3 मुंबई: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांना क्रीडाविश्वासह चाहत्यांकडून श्रद्धांजली
Just Now!
X