News Flash

VIDEO: ‘सुपरमॅन’ ट्रेंट बोल्टने घेतलेला भन्नाट झेल तुम्ही पाहिला का?

तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडकडून बांगलादेशचा धुव्वा

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच संपलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बोल्टने एकहाती झेल टिपत सर्वांना थक्क केले. हा झेल इतका जबरदस्त होता, की आयसीसीनेही बोल्टचा व्हिडिओ शेअर करत त्याचे अभिनंदन केले आहे.

बांगलादेशविरूद्धच्या मालिकेच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात बोल्टने लिटन दासचा झेल टिपला. बांगलादेशच्या फलंदाजीच्या 7व्या षटकात मॅट हेन्री गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर लिटन दासने मारलेला फटका थर्ड मॅनच्या दिशेला गेला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या बोल्टने हवेत सूर मारत हा झेल टिपला. लिटनला 21 धावांवर माघारी परतावे लागले. गोलंदाजीबरोबर बोल्ट क्षेत्ररक्षणातही मातब्बर मानला जातो. आयपीएलमध्येही त्याने दमदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केल्याचे आपण पाहिले आहे.

 

न्यूझीलंडचा मालिकाविजय

डेव्होन कॉनवे (126) आणि डॅरेल मिशेल (नाबाद 100) आणि जेम्स नीशम (5/27) यांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने तिसर्‍या वनडे सामन्यात बांगलादेशला 164 धावांनी पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशसमोर 50 षटकात 6 बाद 318 धावा केल्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 42.4 षटकांत 154 धावांत आटोपला. बांगलादेशकडून महमूदुल्लाने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 76 धावा फटकावल्या. डेव्होन कॉनवेला सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 3:45 pm

Web Title: new zealand pacer trent boult takes stunner in odi against bangladesh adb 96
Next Stories
1 नेमबाजी विश्वचषक : महाराष्ट्राच्या तेजस्विनी सांवतचा सुवर्णवेध
2 वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित
3 IPL : श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ‘हा’ विस्फोटक खेळाडू दिल्लीचा कॅप्टन? लवकरच होणार घोषणा
Just Now!
X