27 February 2021

News Flash

मुंबईत जन्मलेला ऐजाझ पटेल न्यूझीलंडच्या कसोटी संघात

सँटनरच्या अनुपस्थितीत मिळाली संघात जागा

स्थानिक क्रिकेट स्पर्धेत विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करताना ऐजाझ पटेल

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. युएईत खेळवल्या जाणाऱ्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने ऐजाझ पटेल या नवोदीत खेळाडूला संघात जागा दिली आहे. ऐजाझचा जन्म मुंबईत झालेला आहे. मिचेल सँटनरच्या अनुपस्थितीत संघातील फिरकीपटूची जागा भरुन काढण्यासाठी ऐजाझची संघात निवड करण्यात आलेली आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत ऐजाझने केलेली आश्वासक कामगिरी त्याची संघात निवड होण्यासाठी कारणीभूत ठरली आहे.

२९ वर्षीय ऐजाझने स्थानिक प्लंकेट शिल्ड स्पर्धेत खेळत असताना सेंट्रल स्टेज संघाकडून आश्वासक कामगिरी बजावली होती. या हंगामामध्ये ऐजाझने तब्बल ४८ बळी घेतले होते. कसोटी मालिकेसोबतच न्यूझीलंडने वन-डे आणि टी-२० मालिकेसाठीही आपला संघ घोषित केला आहे.

कसोटी मालिकेचा संघ –

केन विल्यमसन (कर्णधार), जीत रावल, टॉम लॅथम, रोस टेलर, हेन्री निकोलस, बी. जे. वॉटलिंग, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉड अॅस्टल, इश सोधी, ऐजाझ पटेल, टिम साऊदी, निल वेंगर, मॅट हेन्री, ट्रेंट बौल्ट

वन-डे मालिकेचा संघ –

केन विल्यमसन (कर्णधार), मार्टीन गप्टील, कॉलिन मुनरो, रॉस टेलर, हेन्री निकोलस, टॉम लॅथम, बी. जे. वॉटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉड अॅस्टल, इश सोधी, टीम साऊदी, मॅट हेन्री, ट्रेंट बौल्ट (इतर दोन खेळाडूंची न्यूझीलंड अ संघातून निवड होणार)

टी-२० मालिकेचा संघ –

केन विल्यमसन (कर्णधार), मार्क चॅपमॅन, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टीन गप्टील, अॅडम मिलने, कॉलिन मुनरो, सेथ रान्स, टीम सिफेर्ट, इश सोधी, टीम साऊदी, रॉस टेलर (इतर दोन खेळाडूंची न्यूझीलंड अ संघातून निवड होणार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 12:44 pm

Web Title: new zealand pick uncapped mumbai born spinner ajaz patel for pakistan tests in uae
टॅग : New Zealand,Pakistan,Uae
Next Stories
1 विश्वचषक विजेता कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधान?; जाणून घ्या इम्रान खानचा प्रवास
2 अल्पवयीन व्हॉलीबॉलपटूवर बलात्कारप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा दाखल
3 बलात्कारप्रकरणात क्रिकेटपटूची पोलिसांकडून चौकशी
Just Now!
X