News Flash

न्यूझीलंडचे खेळाडूही ‘आयपीएल’ला मुकण्याची शक्यता

न्यूझीलंडचा संघ सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

आयपीएल २०२१ : बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली

नवी दिल्ली : ‘आयपीएल’च्या उर्वरित लढती सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात आल्यास इंग्लंडप्रमाणेच न्यूझीलंडचे खेळाडूही त्यामधून माघार घेण्याची शक्यता बळावली आहे. न्यूझीलंडचा संघ सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे कर्णधार केन विल्यम्सन (हैदराबाद), ट्रेंट बोल्ट (मुंबई), कायले जेमिसन (बेंगळूरु), मिचेल सँटनर (चेन्नई) आणि लॉकी फग्र्युसन (कोलकाता) असे प्रमुख खेळाडू ‘आयपीएल’मधील आपापल्या संघांच्या लढतींना मुकण्याची चिन्हे आहेत. सध्या मालदीवमध्ये असलेले न्यूझीलंडचे काही खेळाडू या आठवड्याच्या अखेरपर्यंत थेट इंग्लंडला रवाना होतील, अशी माहिती संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:03 am

Web Title: new zealand players will also miss the ipl akp 94
Next Stories
1 इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटीचे चार वर्षांत तिसऱ्यांदा जेतेपद
2 ‘‘आमच्याकडून शिकून द्रविडनं स्थानिक क्रिकेटला बळकट केलं”
3 शांतपणे मानवतेची सेवा करणाऱ्या परिचारिकांना सचिनने ठोकला सलाम!
Just Now!
X