04 March 2021

News Flash

या संघापासून सावध रहा, न्यूझीलंड पोलिसांची विराटच्या संघाविरुद्ध नोटीस

भारत मालिकेत २-० ने आघाडीवर

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्येही चांगलाच फॉर्मात आहे. ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या २-० अशा आघाडीवर आहे. भारतीय संघाच्या कामगिरीचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. या कामगिरीनंतर न्यूझीलंडच्या Eastern District पोलिसांनीही एका गमतीशीर फेसबूक पोस्टमधून आपल्याच संघाला ट्रोल केलं आहे.

“हा संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आहे आणि नेपियर – माऊंट माऊनगानई येथे या संघाने न्यूझीलंडची चांगलीच धुलाई केली आहे. जर तुम्हाला हा संघ बॅट किंवा बॉल घेऊन फिरताना दिसला तर काळजी घ्या”, अशा आशायचा संदेश टाकत न्यूझीलंड पोलिसांनी भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

अवश्य वाचा – IND vs NZ : भारताच्या ‘गब्बर’ला दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 12:25 pm

Web Title: new zealand police issue warning agianst team india in funnier fb post
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 क्रिकेटच्या मैदानातील सर्वात वयस्कर खेळाडू निवृत्त, वय ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
2 IND vs NZ : भारताच्या ‘गब्बर’ला दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान
3 ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड…16 वर्षीय नेपाळी खेळाडूने मोडला सचिनचा विक्रम !
Just Now!
X