21 September 2020

News Flash

तिसरी कसोटी जिंकून न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

न्यूझीलंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर एक डाव आणि ८० धावांनी विजय मिळवत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

| December 1, 2014 04:31 am

न्यूझीलंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर एक डाव आणि ८० धावांनी विजय मिळवत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
पाकिस्तानचा दुसरा डाव २५९ धावांत आटोपला. असद शफीकने १३७ धावांची खेळी साकारून एकाकी झुंज दिली. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने ३८ धावांत ४ तर फिरकीपटू मार्क क्रेगने १०९ धावांत ३ बळी घेतले. क्रेगने सामन्यात २०३ धावांत १० बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावला आणि पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीझला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाकिस्तानने अबू धाबीची पहिली कसोटी २४८ धावांनी जिंकली होती, त्यानंतर दुबईतील दुसरी कसोटी अनिर्णीत राहिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 4:31 am

Web Title: new zealand register innings win level series 1 1
Next Stories
1 हरिकृष्णचा बाटरेझ सोकोवर
2 अ‍ॅक्युरेट एसेसची आगेकूच प्रीमियर टेनिस स्पर्धा
3 रिअल माद्रिदचा सलग १६वा विजय
Just Now!
X