News Flash

भावनिक ट्विट करत न्यूझीलंडच्या ‘या’ क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा

तो खेळलेल्या विविध क्लबच्या आणि न्यूझीलंड संघाच्या टोप्या एका दोरीवर लावून त्याने ही घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी आपण थकलो असल्याची कबुली देत त्याने या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यानंतर आता न्यूझीलंडच्या एका खेळाडूने भावनिक ट्विट करून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. तो खेळलेल्या विविध क्लबच्या आणि न्यूझीलंड संघाच्या टोप्या एका दोरीवर लावून त्याने हि भावनिक घोषणा केली आहे.

न्यूझीलंडचा सलामीवीर रॉब निकोल याने आपल्या ट्विटर हॅण्डल वरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आज सकाळी त्याने टोप्यांच्या फोटोसह एक ट्विट केले असून त्यात ‘(सगळं) संपलं’ असा भावनिक संदेश लिहिला आहे. या फोटोमध्ये ५ टोप्या लटकवलेल्या दिसत असून त्यात एक टोपी न्यूझक्सिलँडच्या संघाचीही आहे. ती टोपी त्याने मध्यभागी ठेवली आहे.

३५ वर्षीय रॉबने २२ एकदिवसीय, २१ टी २० आणि २ कसोटी सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने एकूण ९४१ धावा केल्या असून त्यात २ शतकांचा समावेश आहे. तसेच, टी २० क्रिकेटमध्येही त्याने अष्टपैलू खेळाडूची भूमिका उत्तमप्रकारे पार पाडली. त्यात पहिले शतक हे त्याने पदार्पणाच्या सामन्यात केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:36 pm

Web Title: new zealand rob nicole retirement
टॅग : New Zealand,Sports
Next Stories
1 Women’s Asia Cup T20 : …तर अंतिम सामन्यात पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने
2 हरयाणा सरकारला अखेर शहाणपण; ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला स्थगिती
3 Womens Asia Cup T20 India vs Pakistan: पाकिस्तानला नमवत भारताची फायनलमध्ये धडक
Just Now!
X