22 October 2020

News Flash

४ ओव्हर्स, ४ विकेट्स आणि शून्य धावा; भारताविरूद्ध पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाचा धमाका

प्रतिस्पर्धी संघावर मिळवला २०७ धावांनी विजय

प्रातिनिधिक छायाचित्र

क्रिकेटचे मैदान हे कायम अनिश्चित घटनांसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या सामन्यात केव्हा काय होईल याचा काहीही नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार कामगिरीमुळे गमावतो. पण नुकत्याच झालेल्या एका सामन्यात गोलंदाजाने दमदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या संघातून खेळणाऱ्या रोजमेरी मेयर या महिला क्रिकेटपटूने एका स्थानिक सामन्यात धडाकेबाज पराक्रम करून दाखवला आहे.

न्यूझीलंडची महिला गोलंदाज रोजमेरी मेयर हिने गुरुवारी एक अनोखा विक्रम नोंदवला. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या श्रीम्प्टन चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत रोजमेरीने डबल हॅटट्रिकची नोंद केली. विशेष म्हणजे आतापर्यंत अशी कामगिरी कुणालाही करता आलेली नाही. रोजमेरीने तडाखेबाज कामगिरी करत ४ षटकांमध्ये एकही धाव न देता ४ चेंडूत ४ बळी घेतले.

 

View this post on Instagram

 

Suns out tongues out

A post shared by Rosemary Mair (@rosemary_mair) on

हॉक बे संघाचे प्रतिनिधित्व करताना रोजमेरी मेयरने १६ चेंडूत ३३ धावा केल्या. त्यामध्ये तिने दोन चौकार आणि तीन षटकार खेचले. तिने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हॉक बे संघाने प्रतिस्पर्धी संघाला २६४ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना तारानाकी संघाचे सगळे फलंदाज ५६ धावांतच माघारी परतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rosemary Mair (@rosemary_mair) on

दरम्यान, न्यूझीलंडच्या २१ वर्षीय रोजमेरीने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत तिने तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 6:16 pm

Web Title: new zealand rosemary mair 4 wickets in 4 balls and 4 maidens international debut against team india vjb 91
Next Stories
1 IND vs BAN : दुसऱ्या टी २० सामन्यात होणार हे ३ विक्रम?
2 …तर मी स्मिथच्या तोंडावर बॉल फेकून मारला असता – अख्तर
3 Video : जेव्हा रोहित शर्मा पत्रकारांना सांगतो; बॉस फोन सायलेंटवर ठेवा !
Just Now!
X