न्यूझीलंडने दिलेलं १९७ धावांचं आव्हान न पेलवल्याने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंडने भारतावर ४० धावांनी मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कॉलिन मुनरोने केलेल्या शतकानंतर, न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सामन्यात ४ बळी घेत भारताच्या महत्वाच्या खेळाडूंना माघारी धाडत सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. त्याला ईश सोधी आणि मिचेल सँटनर या फिरकीपटूंनीही चांगली साथ दिली.
भारताच्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात निराशा केली. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. मधल्या फळीत महेंद्रसिंह धोनीने ४९ धावा काढत न्यूझीलंडला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता. या पराभवामुळे तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्व भारतीय चाहत्यांना लागलेली आहे.
- ३ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड १-१ ने बरोबरीत
- न्यूझीलंडची भारतावर ४० धावांनी मात, ट्रेंट बोल्टचे सामन्यात ४ बळी
- अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात धोनीही माघारी, भारताला सातवा धक्का
- पाठोपाठ ट्रेंट बोल्टने अक्षर पटेलला बाद करत भारताच्या सामन्यात परतण्याच्या शक्यतेवर पाणी फिरवलं
- सँटनरने विराट कोहलीला माघारी धाडत भारताला पाचवा धक्का दिला
- दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी
- विराट कोहली-महेंद्रसिंह धोनी जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- पांड्या माघारी परतल्यानंतर धोनीच्या सहाय्याने कोहलीचं अर्धशतक
- कर्णधार विराट कोहलीचा एका बाजुने लढा सुरुच
- मुनरोने घेतलेल्या विकेटनंतर ईश सोधीचा भारताला झटका, हार्दिक पांड्या त्रिफळाचीत
- मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात कॉलिन मुनरोकडे झेल देत श्रेयस अय्यर माघारी
- दोघांमध्येही तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी
- श्रेयस अय्यर-विराट कोहली जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- पाठोपाठ रोहित शर्मा बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद, भारताला दुसरा धक्का
- भारताच्या डावाची सुरुवात अडखळती, ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर भारताचा शिखर धवन माघारी
- भारतासमोर सामना जिंकण्यासाठी १९७ धावांचं आव्हान, मुनरोच्या ५८ चेंडुत १०९ धावा
- भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत मुनरोचं आक्रमक शतक, ५४ चेंडुत १०१ धावा
- कॉलिन मुनरोची एका बाजूने फटकेबाजी सुरुच
- मात्र विलियमसनला माघारी धाडत मोहम्मद सिराजचा न्यूझीलंडला दुसरा धक्का
- दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी
- कर्णधार केन विलियमसन आणि कॉलिन मुनरोकडून डाव सावरण्याचा प्रयत्न
- मार्टीन गप्टीलला बाद करण्यात भारताला यश, चहलच्या गोलंदाजीवर गप्टील माघारी
- गप्टील-मुनरो जोडीची पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी
- न्यूझीलंडने ओलांडला शंभर धावसंख्येचा टप्पा
- कॉलिन मुनरोची मैदानात चौफेर फटकेबाजी, सामन्यात झुंजार अर्धशतक
- कॉलिन मुनरो-मार्टीन गप्टील जोडीकडून भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल
- दोनही सलामीवीरांकडून न्यूझीलंडच्या डावाची आक्रमक सुरुवात
- भारताकडून मोहम्मद सिराजला संघात स्थान
- नाणेफेक जिंकत न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 6:36 pm