30 October 2020

News Flash

रिकी पाँटींगवर विराट कोहलीची कुरघोडी, मुंबईच्या मैदानात कारकिर्दीतलं ३१ वे शतक

वानखेडे मैदानावर विराटचं शतक

२०१७ या वर्षांत विराट कोहलीने सर्वाधीक धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगला मागे टाकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वाधीक वन-डे शतकांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. रिकी पाँटींगचा ३० शतकांचा विक्रम कोहलीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मोडला, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात १२१ धावांची शतकी खेळी करत विराटने रिकी पाँटीगला मागे टाकलं. विराटने आपल्या २०० व्या आंतराष्ट्रीय वन-डे सामन्यात हा विक्रम केल्यामुळे त्याच्या या शतकी खेळीला आणखी महत्व प्राप्त झालेलं आहे.

वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधीक शतकांच्या यादीत विराट कोहलीच्या पुढे आता भारताचा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. आंतराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती स्वीकारलेल्या सचिनच्या नावावर वन-डे सामन्यात ४९ शतकं जमा आहेत. याव्यतिरीक्त कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने ५१ शतकं केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० शतकं जमा आहेत.

वानखेडे मैदानावरली वन-डे सामन्यात शतक झळकावत, विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये वानखेडे मैदानावर शतक झळकावणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी मोहम्मद अझरुद्दीनने १९८७ साली श्रीलंकेविरुद्ध, तर सचिन तेंडुलकरने १९९६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2017 8:05 pm

Web Title: new zealand tour of india 2017 virat kohli surpass ricky pointing claims 31st century
Next Stories
1 Asia Cup Hockey – आशिया चषक हॉकीत भारत विजेता, अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव
2 अशा पद्धतीने रंगतील प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफचे सामने; ‘या’ संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश
3 ऑस्ट्रेलियाच्या मायकल हसीची प्रो-कबड्डीच्या मैदानात चढाई
Just Now!
X