वेलिंग्टन येथे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी हैनरी निकोलसच्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडनं गड्यांच्या मोबदल्यात २९४ धावा केल्या. पहिल्या दिवशी विंडिज संघाचं क्षेत्ररक्षण अतिशय गचाळ होतं. शतकवीर हैनरी निकोलसचे तीन झेल सोडलं. निकोलसनं मिळालेल्या जिवनदानाचा फायदा घेत शतकी खेळी केली.

गचाळ क्षेत्ररक्षकामुळे विंडिज संघातील वेगवान गोलंदाज शैनन गेब्रियल यांचं जिभेवरील संतुलन सुटलं. गेब्रियलनं संघातील सहकारी खेळाडूला आपत्तीजनक शिवी दिली. ४१ व्या षटकांत गेब्रियलच्या गोलंदाजीवर निकोलसचा सोपा झेल डॅरेन ब्राव्होकडून सुटला. वैतागलेल्या गेब्रियलनं ब्राव्होला शिवीगाळ केली. त्यावेळी निकोलस फक्त ४७ धावांवर होता.

पाहा व्हिडीओ –

 

ब्राव्होकडून झेल सुटल्यानंतर लगेच त्याच धावासंखेवर असताना निकोलसचा आणखी एक जिवनदान मिळालं. चेमार होल्डरकडूनही निकोलसचा झेल सुटला. गेब्रियलनं ब्राव्होला केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.