वेलिंग्टनच्या बेसिन रिझव्‍‌र्ह येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात १५ धावांनी विजय मिळवून न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ५-० असे निभ्रेळ यश मिळवले.

मार्टिन गप्तिलच्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७१ धावा उभारल्या. मग मॅट हेन्रीने पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीला धक्के दिले. मग पाकिस्तानचा डाव २५६ धावांत आटोपला. आता न्यूझीलंडच्या संघाने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून सलग १२ सामने जिंकण्याची किमया साधली आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : ५० षटकांत ७ बाद २७१ (मार्टिन गप्तिल १००, रॉस टेलर ५९; रुममान रईस ३/६७) विजयी वि. पाकिस्तान : ४९ षटकांत सर्व बाद २५६ (हॅरिस सोहेल ६३, शदाब खान ५४; मॅट हेन्री ४/५३, मिचेल सँटनर ३/४०)

सामनावीर व मालिकावीर : मार्टिन गप्तिल.