सलग दोन विश्वचषकांतील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी २०२३मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकातसुद्धा न्यूझीलंड विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू डॅनिएल व्हेटोरीने व्यक्त केली. त्याशिवाय इंग्लंडविरुद्धचा पराभव विसरून पुढील आव्हानांकडे लक्ष देण्याचेही त्याने सुचवले. ‘‘गेल्या काही वर्षांतील न्यूझीलंडची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळे पुढील चार वर्षांतही संघाच्या व्यूहरचनेत फारसा बदल दिसणार नाही. संघाचा ताळमेळ योग्य बसला असून या विश्वचषकातील किमान १०-१२ खेळाडू पुढील विश्वचषकात नक्कीच न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करू शकतात. त्यामुळे २०२३मध्ये न्यूझीलंडने विश्वचषक उंचावला तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही,’’ असे व्होटोरी म्हणाला.