21 October 2020

News Flash

आता लक्ष्य ऑलिम्पिक पदकाचेच – दीपा

ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केल्यामुळे माझे मनोधैर्य उंचावले आहे. या स्पर्धेसाठी अजून बराच कालावधी आहे.

| April 20, 2016 04:00 am

ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केल्यामुळे माझे मनोधैर्य उंचावले आहे. या स्पर्धेसाठी अजून बराच कालावधी आहे. त्याचा फायदा घेत ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे, असे भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने येथे सांगितले.
दीपा या २२ वर्षीय खेळाडूने ५२.६९८ गुण मिळवित कलात्मक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. तिने व्हॉल्ट या प्रकारात १४.८३३ गुण नोंदवित सोनेरी कामगिरी केली. तिने २००८ ची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती ओक्साना चुसोवितिना (उजबेकिस्तान) हिच्यावर मात केली. जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केलेली दीपा ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. १९६४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सहा खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर प्रथमच भारतीय खेळाडूला जिम्नॅस्टिक्समध्ये प्रवेश मिळाला आहे.
दीपाने सांगितले, ‘ऑलिम्पिक प्रवेश हा माझ्यासाठी सुवर्णपदक जिंकल्याचाच अनुभव आहे. अर्थात आता माझी खरी कसोटी आहे. ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी जगातील अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंशी मला झुंज द्यावी लागणार आहे. मात्र मेहनत व जिद्द याच्या जोरावर ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न मी साकार करेन अशी मला खात्री आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 4:00 am

Web Title: next objective is a medal in rio olympics 2016 says dipa karmakar
टॅग Dipa Karmakar
Next Stories
1 रोहिणी राऊतबाबत २६ एप्रिलला निर्णय
2 नोव्हाक, सेरेना यांना लॉरेस पुरस्कार
3 वेस्ट इंडिजच्या नकारामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ नाराज
Just Now!
X