06 August 2020

News Flash

नेयमारचा दुहेरी धमाका, ब्राझीलचा अमेरिकेला दणका

नेयमारने केलेल्या दोन गोलांमुळेच ब्राझीलने अमेरिकेविरुद्धच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत शानदार विजय मिळविला.

नेयमारने केलेल्या दोन गोलांमुळेच ब्राझीलने अमेरिकेविरुद्धच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत शानदार विजय मिळविला.
घरच्या मैदानावर चांगल्या कामगिरीची अमेरिकेला आशा होती, मात्र नेयमारने त्यांची निराशा केली. विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत पुढील महिन्यात ब्राझीलची चिली संघाशी गाठ पडणार आहे. अमेरिकेविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. हुल्क व राफिना यांनी प्रत्येकी एक गोल करीत ब्राझीलच्या विजयास हातभार लावला. अमेरिकेचा एकमेव गोल डॅनी विल्यम्स याने ९०व्या मिनिटाला केला. त्याने ३० यार्ड्स अंतरावरून सुरेख फटका मारून हा गोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2015 12:59 am

Web Title: neyamar done two goals and brasil win against usa
Next Stories
1 रुनीची गोलपन्नाशी! स्वित्झर्लंडवर २-० गोलने विजय
2 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा: सानिया-हिंगीस जोडीची उपांत्य फेरीत धडक
3 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : मरे माघारी..
Just Now!
X