26 February 2021

News Flash

हो, मी ओव्हर अॅक्टींग केली! ब्राझीलच्या नेमारची कबुली

ट्विटरवरुन दिली कबुली

विश्वचषकादरम्यान नेमार (संग्रहीत छायाचित्र)

रशियात नुकत्याच पार पडलेल्या फिफा विश्वचषकात फ्रान्सच्या संघाने अंतिम फेरीत क्रोएशियावर मात करुन विजेतेपद पटकावलं. मात्र अनेक दादा संघांना या विश्वचषकात लवकर गाशा गुंडाळावा लागला. स्टार फुटबॉलपटू नेमारच्या ब्राझीललाही यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठता आली नाही. उपांत्यपूर्व सामन्यात बेल्जियमने ब्राझीलवर मात केली. मात्र या स्पर्धेदरम्यान नेमारचं मैदानावरचं विव्हळणं चांगलचं गाजलं. यावरुन अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता खुद्द नेमारनेच आपण विश्वचषकादरम्यान, दुखापत झाल्याची ओव्हरअॅक्टींग केल्याचं मान्य केलं आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर नेमारने कबुलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यंदाच्या फिफा विश्वचषकात नेमारने २ गोल झळकावले. मात्र महत्वाच्या सामन्यात तो आपल्या संघाची नौका पार करु शकला नाही. “मैदानात एखादी घटना अधिक रंजकपणे करण्यासाठी मी हा प्रयत्न करत असतो असं काहींचं म्हणणं आहे. हो मी कधीकधी असं करतो. कारण मैदानात एक खेळाडू म्हणून मला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.” नेमारने घडलेल्या प्रकाराबद्दल कबुली दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2018 1:41 pm

Web Title: neymar admits exaggerated reactions at world cup while suffering on the pitch
टॅग : FIFA 2018,Neymar
Next Stories
1 आयसीसी वन-डे क्रमवारीत भारतीयांचं वर्चस्व कायम
2 World Badminton Championship : एच. एस. प्रणॉय पुढच्या फेरीत दाखल
3 ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलची शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी
Just Now!
X