29 September 2020

News Flash

कोपा अमेरिका स्पध्रेतून नेयमार बाहेर

ब्राझील संघाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेत पुढील सामने कर्णधार नेयमारशिवाय खेळावे लागणार आहेत.

| June 23, 2015 12:23 pm

ब्राझील संघाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेत पुढील सामने कर्णधार नेयमारशिवाय खेळावे लागणार आहेत. नेयमारवरील चार सामन्यांच्या बंदीविरोधात ब्राझिलियन फुटबॉल महासंघाने (सीबीएफ) दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे नेयमार कोपा अमेरिकाच्या उर्वरित सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे. कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलला १-० असा पराभव पत्करावा लागला होता आणि त्या सामन्यात नेयमारने कोलंबियाचा खेळाडू जेसन मुरील्लो याच्याशी गैरवर्तणूक केली होती. त्याच्या या वर्तणुकीमुळे त्याला लाल कार्डही दाखविण्यात आले होते. त्यानंतर त्याने सामनाधिकारी एन्रीक ओसेस यांच्याशी वाद घातला. त्यामुळे त्याच्यावर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. याविरोधात सीबीएफने रविवारी याचिका दाखल केली, परंतु सोमवारी ती मागे घेतली.
‘‘नेयमार आणि ब्राझीलचे सहयोगी प्रशिक्षकांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही याचिका मागे घेण्याचा निर्णय सीबीएफने घेतला,’’ अशी माहिती सीबीएफने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 12:23 pm

Web Title: neymar out of copa america after brazil accept four match ban
टॅग Neymar
Next Stories
1 नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा : नाकामुराविरुद्धच्या बरोबरीसह आनंदचे तिसरे स्थान कायम
2 ऑलिम्पिक संयोजनपदाच्या शर्यतीत आता पॅरिस व बुडापेस्ट
3 वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरी : पर्यटनाला नाही, जिंकायला आलोय – सरदार
Just Now!
X