03 April 2020

News Flash

ब्राझिलियन ग्रां प्रि : रोसबर्गचा दबदबा

मर्सिडिजच्या निको रोसबर्गने ब्राझिलियन ग्रां प्रि फॉम्र्युला वन शर्यतीत जेतेपद पटकावले.

विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनवर ७.७ सेकंदाच्या फरकाने कुरघोडी करत मर्सिडिजच्या निको रोसबर्गने ब्राझिलियन ग्रां प्रि फॉम्र्युला वन शर्यतीत जेतेपद पटकावले.

* विश्व अजिंक्यपद शर्यतपटूंमध्ये उपविजेतेपद
* हॅमिल्टन ७.७ सेकंदाच्या फरकाने दुसरा
विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनवर ७.७ सेकंदाच्या फरकाने कुरघोडी करत मर्सिडिजच्या निको रोसबर्गने ब्राझिलियन ग्रां प्रि फॉम्र्युला वन शर्यतीत जेतेपद पटकावले. या विजयासोबत त्याने फॉम्र्युला वन विश्व अजिंक्यपद शर्यतपटूंचे उपविजेतेपदही निश्चित केले. ३० वर्षीय रोसबर्गने मेक्सिकोपाठोपाठ ब्राझीलमध्येही दबदबा सिद्ध करत सलग दुसऱ्या शर्यतीत बाजी मारली. रोसबर्गने १ तास ३१ मिनिटे ०९.०९ सेकंदात शर्यत पूर्ण केली.
यंदाच्या वर्षांतील पाचव्या पोल पोझिशनपासून सुरुवात करणाऱ्या रोसबर्गने गाडीवर अचूक नियंत्रण ठेवत अखेपर्यंत अव्वल स्थान कायम राखले. रोसबर्गचे यंदाच्या हंगामातील हे पाचवे, तर कारकीर्दीतील १३वे जेतेपद आहे. रस्ता अपघात आणि आजारपणातून सावरत हॅमिल्टन २४ तासांच्या प्रवासानंतर ब्राझीलमध्ये दाखल झाला होता. त्याने १ तास ३१ मिनिटे १६.१६ सेकंदात शर्यत पूर्ण करून दुसरे स्थान पटकावले, तर चार वेळा विश्वविजेतेपद जिंकणारा फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल (१ तास ३१ मिनिटे २३.२४ सेकंद) तिसऱ्या स्थानावर आला. फेरारीचाच किमी रैकोनेन चौथा, तर विलियम्सचा व्ॉल्टेरी बोट्टास पाचवा आला. फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

फोर्स इंडियाची सर्वोत्तम कामगिरी
’ब्राझिलियन ग्रां. प्रि. शर्यतीत निको हल्केनबर्गला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले असले, तरी संघाच्या गुणतालिकेत फोर्स इंडियाने पाचवे स्थान पटकावले आहे. फोर्स इंडियाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. ब्राझील शर्यतीत हल्केनबर्गने संघाला आठ गुण मिळवून दिले आणि त्यामुळे १२० गुणांसह संघाने पाचवे स्थान निश्चित केले आहे.
’‘‘सहावे स्थान पटकावून मी समाधानी आहे आणि या गुणांमुळे संघाला पाचवे स्थान निश्चित करण्यात मदत मिळाल्याचा आंनद आहे. संघाच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे आणि वर्षांनुवष्रे आम्ही प्रगती करत असल्याचे हे प्रतीक आहे. संघातील प्रत्येकाच्या मेहनतीचे हे फळ आहे,’’ अशी प्रतिक्रिया हल्केनबर्गने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2015 12:29 am

Web Title: nico rosberg beats lewis hamilton in brazilian grand prix
Next Stories
1 कनिष्ठ पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धा : सातत्यपूर्ण खेळ करण्यावर भारताचा भर
2 तिसऱ्या दिवशीही पाऊस
3 अखिलने मुंबईला सावरले ; मुंबईकडे शतकी आघाडी
Just Now!
X