News Flash

निधास चषक २०१८ – जाणून घ्या भारत-बांगलादेश-श्रीलंका तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

मार्च ६ पासून रंगणार मालिका

श्रीलंकेच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त तिरंगी मालिकेचं आयोजन

सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी आगामी दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारताला ६ सामन्यांची वन-डे आणि ३ सामन्यांची टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. मार्च महिन्यात भारत-श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात तिरंगी मालिका रंगणार आहे.

६ ते १८ मार्चदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेचं वेळापत्रक नुकतच जाहीर करण्यात आलेलं आहे. श्रीलंकेच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त या तिरंगी मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा मैदानात हे सर्व टी-२० सामने रंगणार आहेत. १९९८ साली श्रीलंका-भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवण्यात आली होती, ज्यात अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर ६ धावांनी मात केली होती.

निधास चषक तिरंगी मालिकेचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

मार्च ६ २०१८ – श्रीलंका विरुद्ध भारत

मार्च ८ २०१८ – भारत विरुद्ध बांगलादेश

मार्च १० २०१८ – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

मार्च १२ २०१८ – श्रीलंका विरुद्ध भारत

मार्च १४ २०१८ – भारत विरुद्ध बांगलादेश

मार्च १६ २०१८ – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

मार्च १८ २०१८ – अंतिम सामना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 12:00 pm

Web Title: nidhas trophy 2018 detailed schedule announced for india bangladesh sri lanka series
टॅग : Bangladesh,Sri Lanka
Next Stories
1 प्रो-कबड्डीच्या सहाव्या आणि सातव्या हंगामाची तारीख ठरली, ३ महिने रंगणार कबड्डीचा थरार
2 आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर, सिंधू-सायना, किदम्बी श्रीकांतचा संघात समावेश
3 मॅरेथॉनच्या पलीकडे!
Just Now!
X