निधास चषकातील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन केलं. कोलंबोच्या प्रेमदासा मैदानात खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ गडी राखून विजय मिळवला. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर हा सामना १९ षटकांचा खेळवण्यात आला होता. फलंदाजीत दिनेश कार्तिक आणि मनिष पांडे तर गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला.

दरम्यान कालच्या सामन्यात ६ विक्रमांचीही नोंद करण्यात आली.

१- टी-२० क्रिकेट मध्ये हिट विकेट (स्वयंचित) होणारा लोकेश राहुल हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये अनुक्रमे लाला अमरनाथ आणि नयन मोंगिया हे खेळाडू पहिल्यांदा हिट विकेट बाद झाले होते.

१- कालच्या सामन्यात लोकेश राहुलची ५०.८९ ही सरासरी आतापर्यंतच्या टी-२० सामन्यातली सर्वोत्तम सरासरी मानली जात आहे.

३- दोन्ही डावांतील पहिल्या ३ चेंडूवर दोन्ही फलंदाजांनी मिळून २१ धावा कुटल्या. टी-२० क्रिकेटमध्ये याआधी विक्रम १८ धावांचा होता.

११- गेल्या ११ डावांमध्ये रोहित शर्माच्या नावावर केवळ एक अर्धशतक जमा आहे. हा रोहित शर्माच्या टी-२० कारकिर्दीतला सर्वात मोठा बॅड पॅच मानला जात आहे. गेल्या सात डावांमध्ये रोहितने अनुक्रमे २७, २१, ०, ११, ०, १७, ११ अशा धावा काढल्या आहेत.

१४ – घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक टी-२० सामने गमावण्याच्या विक्रमाची श्रीलंकेच्या संघाने बरोबरी केली आहे. याआधी झिम्बाब्वेच्या संघाने हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सलग १४ सामने गमावले आहेत.

१९ – घरच्या मैदानात खेळताना सर्वाधिक टी-२० सामने गमावणाऱ्यांच्या यादीत श्रीलंका दुसऱ्या स्थानावर. २१ पराभवांसह दक्षिण आफ्रिका या यादीत पहिल्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा संघ १९ पराभवांसह दुसऱ्या तर न्यूझीलंडचा संघ १७ पराभवांसह तिसऱ्या स्थानावर आहे.