21 September 2020

News Flash

ऑस्ट्रेलियाला भारताचा धक्का

अझलन हॉकी चषक स्पध्रेत भारतीय संघाने निक्कीन थिमय्या याच्या हॅट्ट्रिकच्या बळावर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर ४-२ असा सनसनाटी विजय मिळवला.

| April 12, 2015 03:18 am

अझलन हॉकी चषक स्पध्रेत भारतीय संघाने निक्कीन थिमय्या याच्या हॅट्ट्रिकच्या बळावर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर ४-२ असा सनसनाटी विजय मिळवला. भारताने या  विजयाबरोबरच तिसऱ्या क्रमांकासाठी होणाऱ्या लढतीत स्थान मिळविले.
व्ही. आर. रघुनाथ याने पहिल्याच मिनिटाला भारताचे खाते उघडून कांगारूंना धोक्याचा इशारा दिला. थिमय्या याने २३व्या, ३२व्या व ६०व्या मिनिटाला गोल करीत संघास महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.  
ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल बिएल (१४ वे मिनिट) व मॅट गोहदेस (५३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.  साखळी गटातील भारताचा हा शेवटचा सामना होता. त्यांनी
पाच सामन्यांमध्ये सात गुणांची कमाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 3:18 am

Web Title: nikkin thimmaiah scores hat trick as india stun australia 4 2 in azlan shah cup
टॅग India Vs Australia
Next Stories
1 BLOG: रिच रिची
2 खासगी आयुष्यावरील टीकेला विराट कोहलीने फटकारले
3 कश्यपची उपांत्य फेरीत धडक
Just Now!
X