रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

विदर्भाविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत खेळताना कर्नाटकाची बाजू डगमगत असताना सलामीवीर देगा निश्चलने चिवट खेळी साकारत आपले अर्धशतक पूर्ण करून सामन्यात नियंत्रण मिळवले, तर विदर्भाने पहिल्या डावात सर्वबाद ३०७ धावा केल्या. मंगळवारी पहिल्या डावात फलंदाजी करत कर्नाटकाने ५ बाद २०८ धावा केल्या असून ९९ धावा पिछाडीवर आहे.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या सिव्हिल लाईन्स मदानावर हा सामना सुरू आहे. सोमवारी पहिल्या डावात विदर्भाने दिवसअखेर ८ बाद २४५ धावा केल्या. मंगळवारी दुसऱ्या दिवशी श्रीकांत वाघ (३७), ललित यादव (७) डावाला सुरुवात झाली. श्रीकांतने सकाळच्या सत्रातच आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ५७ धावांवर असताना तो विनयकुमारचा शिकार ठरला.

श्रीकांतने ८३ चेंडू ९ चौकारच्या मदतीने ५७ धावा केल्या. ललित १४ धावांवर बाद झाला आणि अक्षय वखरेने नाबाद ३५ धावा जोडल्या आणि विदर्भाला सर्वबाद ३०७ धावांपर्यंत पोहोचवले.

कर्नाटकचा जगदीशा सूचिथने सर्वाधिक चार तर अभिमन्यू मिथुनने तीन गडी टिपले. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या कर्नाटकाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर रविकुमार समर्थला दुसऱ्याच षटकांत फिरकीपटू सरवटेने झेलबाद केले. त्यानंतर आलेला कृष्णमूर्ती सिद्धार्थ १९ धावांवर वखरेचा शिकार ठरला. करुण नायरही विशेष खेळी साकारू शकला नाही आणि केवळ १५ धावांवर पायचित झाला, तर दुसऱ्या बाजूने देगा निश्चलने संयमी खेळी साभाळत झुंजारू खेळी साकारत होता.

स्टुअर्ट बिन्नीला वखरेने आपल्या फिरकी जाळ्यात अडकवून केवळ २० धावांवर परतवून लावले. दरम्यान, निश्चलने आपले झुंजारू अर्धशतक पूर्ण करून डाव सांभळण्यात मोलाची खेळी साकारली. चहाच्या वेळेनंतर श्रेयस गोपाल आणि निश्चलने बऱ्यापकी धावफलक हालता ठेवला मात्र दर्शन नळकांडेने श्रेयसला (३०) झेलबाद करून माघारी पाठवले. यष्टिरक्षक आर. शरथ आणि निश्चल जोडीने डाव सांभाळत फलंदाजी केली आणि कर्नाटकाने दुसऱ्या दिवस अखेर पहिल्या डावात ५ बाद २०८ धावा केल्या.

आर. शरथ (४६), निश्चल (६६) धावांवर खेळत आहे. एकंदरीत घरच्या मदानावर फिरकीपटूंची प्रभावी गोलंदाजी दिसून आली. आदित्य सरवटे आणि अक्षय वखरेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. कर्नाटक ९९ धावांनी पिछाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक:

विदर्भ (पहिला डाव) १०२.२ षटकांत सर्वबाद ३०७ (वसीम जाफर ४१, गणेश सतीश ५७ , श्रीकांत वाघ ५७; जगदीशा सूचिथ ४/३३, अभिमन्यू मिथून ३/५३,) वि. कर्नाटक (पहिला डाव) ७२ षटकांत ५ बाद २०८ (श्रेयस गोपाल ३०, देगा निश्चल नाबाद ६६, आर. शरथ ४६; आदित्य सरवटे २/४४, अक्षय वखरे २/५५).s