News Flash

निशिकोरी, प्लिस्कोव्हा यांची विजयी सलामी!

पुरुष एकेरीत सातव्या मानांकित निशिकोरीने अर्जेनिटाच्या मार्को ट्रंगेलिटीचा ६-१, ४-१ असा धुव्वा उडवला.

(संग्रहित छायाचित्र)

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

जपानचा अनुभवी टेनिसपटू केई निशिकोरी आणि चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी सोमवारपासून सुरू झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील सामन्यात विजयी सलामी दिली.

पुरुष एकेरीत सातव्या मानांकित निशिकोरीने अर्जेनिटाच्या मार्को ट्रंगेलिटीचा ६-१, ४-१ असा धुव्वा उडवला. सर्बियाच्या २७व्या मानांकित दुसान लाजोव्हिचने स्टीव्ह डार्सिसचा ७-५, ६-३, ६-३ असा पराभव केला.

महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित प्लिस्कोव्हाने चेक प्रजासत्तकच्याच तेरेझा मार्टिनकोव्हावर ७-६ (८-६), ७-६ (७-३) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. अन्य सामन्यात लॅटव्हियाच्या १२व्या मानांकित अनास्ताजिआ सेव्हास्टोव्हाने कॅनडाच्या एगुनि बौचार्डवर ६-३, ६-३ असे वर्चस्व गाजवले. ग्रेट ब्रिटनच्या १६व्या मानांकित जोहना कोंताने डेरिया कस्टाकिनाला ६-१, ४-६, ६-२ असे नमवले.

दुहेरीत दिविज, पेस, बोपण्णा यांच्यावर नजरा

पुरुष दुहेरीतील सामन्यांना मंगळवारपासून सुरुवात होणार असून दिविज शरण, लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा या टेनिसपटूंवर भारतीय चाहत्यांचे विशेष लक्ष असेल. बोपण्णा डेनिस शापोवालोव्हच्या साथीने खेळणार आहे. दिविज ह्य़ुगो नाइसह खेळणार आहे, तर पेस यावेळी गुलिर्मो दुरानच्या साथीने कोर्टवर उतरणार आहे.

सामन्यांची वेळ : रात्री ८.३० वा. (पहिल्या फेरीचे सामने)

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि सिलेक्ट २

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 12:45 am

Web Title: nishikori pliskovas winning in american open tennis tournament abn 97
Next Stories
1 मेसी आणि लीब्रोनच्या शैलीत ग्रीझमनचे गोल
2 प्रशिक्षक भावसार आणि दीपिकावर पाच वर्षांची बंदी
3 IND vs WI : भरमैदानात विराटने केलं दांडिया सेलिब्रेशन
Just Now!
X