01 April 2020

News Flash

‘त्या’ तिघांना जमलं नाही ते कोलकात्याच्या ‘राणादा’ने करुन दाखवलं!

ईडन गार्डन्सवरील केकेआरच्या या विजयात महत्वाची भूमिका बजावली ती नितीश राणाने. त्यामुळे सोशल मीडियावर नितीश राणाची भरपूर चर्चा सुरु आहे. दिनेश कार्तिकने पार्ट

स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला रविवारी दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सने पराभवाचा दणका दिला. ईडन गार्डन्सवरील केकेआरच्या या विजयात महत्वाची भूमिका बजावली ती नितीश राणाने. त्यामुळे सोशल मीडियावर नितीश राणाची भरपूर चर्चा सुरु आहे. संपूर्ण सामन्यात फक्त एकच षटक टाकणाऱ्या नितीश राणाने लागोपाठच्या दोन चेंडूवर विराट कोहली आणि डीव्हिलियर्स या दोन महत्वाच्या विकेटस मिळवल्या. खरंतर कोलकात्याच्या संघात पियुष चावला, कुलदीप यादव, सुनील नरीन असे एकाहून एक सरस गोलंदाज आहेत. पण त्यांना जे जमलं नाही ते नितीश राणाने करुन दाखवलं.

डिविलियर्स फटकेबाजी करत असताना दिनेश कार्तिकने पार्ट टाइम ऑफ स्पिनर नितीश राणाकडे चेंडू सोपवला. नितीशच्या पहिल्याच चेंडूवर डीव्हिलियर्सने  षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर डीव्हिलियर्सला  जॉन्सनकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच एका अप्रतिम चेंडूवर त्याने कर्णधार कोहलीली क्लीन बोल्ड केले. त्यानंतर फलंदाजी करताना नितीशने ३४ धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

खरंतर सुनील नरीन कोलकाताचा सर्वात भरवशाचा गोलंदाज आहे. पण नरीनने या सामन्यात बॅटीने कमाल दाखवली. नरीनने १९ चेंडूत ५० धावांची वादळी खेळी केली. यात चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. उलट मिळवण्यासारखे भरपूर काही होते. मी पियुष चावला आणि सुनिल नरीन यांना गोलंदाजी करताना पाहत होता. बॉलवर पकड मिळत होती. त्यामुळे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर फायदा होणार याची मला खात्री होती. सामन्यात त्या क्षणाला विकेट मिळवणे महत्वाचे होते असे नितीश राणा म्हणाला.

कार्तिकने राणाच्या हाती चेंडू दिला तेव्हा धावफलकावर बंगळुरुच्या १४ षटकात २ बाद १२१ धावा झाल्या होत्या. कदाचित त्या क्षणाला राणाने विकेट काढल्या नसत्या तर बंगळुरुने मोठी आणखी मजल मारली असती. बंगळुरुने २० षटकात १७६ धावा केल्या. कोलकाताने १८.५ षटकात चार विकेट राखून हे आव्हान सहज पार केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2018 1:14 pm

Web Title: nitish rana ipl kkr rcb
टॅग Ipl,Kkr,Rcb
Next Stories
1 या ५ कारणांमुळे विराट कोहलीच्या संघाने आयपीएलमध्ये पहिला सामना गमावला
2 IPL 2018 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सामना गमावला, मात्र मॅक्युलमच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद
3 IPL 2018 : राहुलच्या विक्रमी अर्धशतकामुळे पंजाबचा दिल्लीवर ६ गडी राखून विजय
Just Now!
X