News Flash

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित

विंडीजचा शतकवीर नाक्रुमाह बोनर सामनावीर

अँटिगा येथील सर विव्हियन रिचडर्स स्टेडियमवर खेळला गेलेला वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. या कसोटीच्या पाचव्या दिवशी विंडीजचा फलंदाज नाक्रुमाह बोनरने (नाबाद 113) शतकी खेळी करत श्रीलंकेसोबतची ही कसोटी अनिर्णित राखली. बोनरला काइल मेयर्सच्या (52) अर्धशतकी खेळीची साथ लाभली.

श्रीलंकेने विंडीजला विजयासाठी 375 धावांचे लक्ष्य दिले होते. पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विंडीजने दुसर्‍या डावात चार बाद 236 धावा केल्या. बोनरला सामनावीर म्हणून निवडले गेले. विंडीजकडून पहिला कसोटी सामना खेळणार्‍या बोनरने 274 चेंडूंत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 113 धावांची नाबाद खेळी केली. तर, जेसन होल्डर 18 धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून विश्वा फर्नांडो आणि लसिथ एम्बुल्डेनिया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी, पाचव्या दिवशी विंडीजने 1 बाद 34 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. बोनरने 15 तर, कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 8 धांवांपासून आपल्या खेळीला पुढे नेले. ब्रेथवेट बाद झाल्यानंतर बोनरने मेयर्ससमवेत डाव सांभाळला. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 105 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बोनरनेही आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले.

मेयर्स आणि बोनर यांच्यातील भागीदारी तुटल्यानंतर बोननरने एक बाजू लावून धरत सामना अनिर्णित राखला. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. दोन्ही संघांमधील मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना 29 मार्चपासून याच मैदानावर खेळला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 2:46 pm

Web Title: nkrumah bonner century helpes west indies draws with sri lanka adn 96
Next Stories
1 IPL : श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ‘हा’ विस्फोटक खेळाडू दिल्लीचा कॅप्टन? लवकरच होणार घोषणा
2 चेन्नईच्या फलंदाजीत येणार बळ, अफगाणिस्तानवरून मागवला नेट बॉलर!
3 ओर्लीअन्स मास्टर्स स्पर्धेत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X