News Flash

विदेश दौऱ्यावर पत्नी- प्रेयसीला नेण्याबाबत कोणताही निर्णय नाही – BCCI

विराटने BCCIकडे केली होती मागणी

क्रिकेटपटूंना विदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास BCCIने परवानगी दिली आहे, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये दिसत होत्या. मात्र विदेश दौऱ्याबाबत असा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्टीकरण BCCIच्या प्रशासकीय समिती (CoA)च्या सदस्या डायना एडल्जी यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. या संदर्भात आणखी मते मागविली जातील. यावर अधिक विचारविनिमय केला जाईल. पण सध्या तरी इतकेच सांगू शकेन की माध्यमांमध्ये फिरणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत, असे एडल्जी यांनी सांगितले. पहिले १० दिवस पत्नीला किंवा प्रेयसीला त्या दौऱ्यावर खेळाडूसोबत राहता येणार नाही. त्यानंतर मात्र साथीदार ती क्रिकेटपटूसोबत दौऱ्यावर राहू शकते, असे वृत्त होते. हे वृत्त आज त्यांनी खोडून काढले.

विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर पत्नी अनुष्का शर्मालासोबत घेऊन गेला होता. तेव्हा पत्नीला किंवा प्रेयसीला विदेश दौऱ्यांवर सोबत घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. यामुळे विराटवर भरपूर टीका करण्यात आली होती. त्यामुळे पत्नी किंवा प्रेयसीलाही सोबत घेऊन जाण्यास परवानगी असावी अशी मागणी विराटने BCCIकडे केली होती. यावर विचार करून BCCI निर्णय घेणार आहे. परवानगी दिली असली, तरी एक अट घातली आहे. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने अॅशेससाठी खेळाडूंना पत्नी-प्रेयसीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. याचा ऑस्ट्रेलियाला फायदा झाला होता. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 3:25 pm

Web Title: no decision taken about taking wags on overseas tours says bccis committee of administrators coa member diana edulji
Next Stories
1 …तोपर्यंत क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारणार नाही – गौतम गंभीर
2 PAK vs AUS : ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा जायबंदी, भारताविरुद्ध मालिकेतील सहभागावर प्रश्नचिन्ह
3 Pro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम
Just Now!
X