आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा(आयसीसी) यंदाच्या वर्षाचा कसोटी आणि एकदिवसीय संघ जाहीर झाला असून यामध्ये एकाही भारतीय फलंदाजाला स्थान मिळवता आलेले नाही. १८ सप्टेंबर २०१४ ते १३ सप्टेंबर २०१५ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या कामगिरीच्या निष्कर्षांवरून संघ निवडण्यात आला आहे. ‘आयसीसी’च्या २०१५ च्या कसोटी संघाचे नेत्तृत्व इंग्लंडच्या अॅलिस्टर कूकला देण्यात आले, तर एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून द.आफ्रिकेच्या ए.बी.डीव्हिलियर्सची निवड करण्यात आली आहे. भारताकडून मोहम्मद शमी आणि आर.अश्विन यांना वगळता इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही.  मोहम्मद शमीला आयसीसीच्या एकदिवसीय संघात, तर  फिरकीपटू आर.अश्विनला कसोटी संघात अतिरिक्त खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी करणारा न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथची आयसीसीच्या दोन्ही संघात वर्णी लागली आहे.

आयसीसीचा कसोटी संघ- (२०१५)
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
अॅलिस्टर कूक (इंग्लंड)(कर्णधार)
केन विल्यम्स (न्यूझीलंड)
युनीस खान (पाकिस्तान)
स्टीव्हन स्मिथ(ऑस्ट्रेलिया)
जो रुट (इंग्लंड)
सरफराज अहमद (पाकिस्तान)(यष्टीरक्षक)
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
यासिर शहा (पाकिस्तान)
जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया)
१२ वा खेळाडू- आर.अश्विन (भारत)

आयसीसीचा एकदिवसीय संघ (२०१५)-
तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)
हशिम अमला (द.आफ्रिका)
कुमार संगकारा (श्रीलंका)(यष्टीरक्षक)
ए.बी.डीव्हिलियर्स (द.आफ्रिका)(कर्णधार)
स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
रॉस टेलर (न्यूझीलंड)
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
मोहम्मद शमी (भारत)
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
मुस्ताफिझूर रेहमान(बांग्लादेश)
इमरान ताहिर (द.आफ्रिका)
१२ वा खेळाडू- जो रूट (इंग्लंड)