सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत काही लोक पूर्णपणे आराम करत आहेत. काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत.

रोहितचा २६४ धावांचा विक्रम कोण मोडणार? श्रीसंतने दिलं उत्तर

 

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने नुकतेच त्याचे आवडते सर्वकालीन सर्वोत्तम अकरा कसोटी खेळाडू घोषित केले आहेत. पण आश्चर्याचे कारण म्हणजे त्याने सांगितलेल्या सर्वोत्तम ११ कसोटीपटूंच्या संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. क्रिकेटच्या इतिहासात दमदार कामगिरी करणारा सचिन तेंडुलकर, आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ किंवा दक्षिण आफ्रिकेचा मिस्टर ३६० एबी डीव्हिलियर्स या कोणाचाही या संघात डेल स्टेनने समावेश केलेला नाही.

लाजिरवाण्या ११ खेळाडूंच्या यादीत मुंबईकर अजित आगरकरचं नाव; जाणकार, चाहते संतापले

‘टीम इंडिया’ला धक्का! क्रिकेट स्पर्धा बंद असूनही गमावलं अव्वल स्थान, कारण…

स्टेनने आपल्या आवडत्या सर्वोत्तम कसोटी संघात केवळ दोन विदेशी खेळाडूंना स्थान दिले असून इतर नऊ खेळाडू हे आफ्रिकेच्याच संघातील आहेत. स्टेनने ग्रॅम स्मिथसोबत श्रीलंकेचा कुमार संगाकारा यालाही संघात सलामीवीर म्हणून निवडले आहे. त्यानंतर संघात जॅक कॅलीस, जॉन्टी ऱ्होड्स, क्विंटन डी कॉक यांच्यासह देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार क्रिकेटपटू डेव्ह हॉकेन, ब्रेट बार्गियची यांचाही समावेश आहे. तर गोलंदाजीसाठी पीटर लोम्बार्ड, ब्रेट ली, पॉल हॅरिस, अलन डोनाल्ड यांच्यासह विदेशी खेळाडू ब्रेट ली याला संघात स्थान देण्यात आले आहे.