News Flash

IND vs AUS : भारतीय क्रिकेटला वाहून घेतलेला धोनीइतका कोणीही नाही – विराट कोहली

अंतिम सामन्यात धोनीची निर्णायक खेळी

धोनी मालिकावीर पुरस्काराचा मानकरी

तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून मात करत ३ सामन्यांची मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियात कसोटी पाठोपाठ वन-डे मालिका जिंकण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं २३१ धावांचं आव्हान पूर्ण करताना धोनी आणि केदार जाधवने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सामन्यात बाजी मारली. या मालिकेत धोनीला आपला हरवलेला सूर पुन्हा एकदा गवसला आहे. ३ सामन्यांत धोनीने ३ अर्धशतकं झळकावून मालिकावीराचा किताब पटकावला. कर्णधार विराट कोहली धोनीच्या कामगिरीवर भलताच खूश आहे.

अवश्य वाचा – भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय

“एक संघ म्हणून धोनीसाठी आम्ही खूप आनंदी आहोत. त्याच्या बॅटमधून धावा निघणं, आणि त्याचा आत्मविश्वास त्याला परत मिळणं हे आमच्यासाठी अत्यंत गरजेचं होतं. मैदानाबाहेर अनेक गोष्टी घडत असतात, लोकं टिका-टिपण्णी करत असतात; पण भारतीय क्रिकेटला वाहून घेतलेला धोनीइतका कोणताही खेळाडू नाहीये हे आम्ही सर्वजण जाणतो. त्यामुळे धोनीला त्याचा वेळ देणं गरजेचं आहे.” विराट धोनीच्या खेळाचं कौतुक करत होता.

अवश्य वाचा – IND vs AUS : ….तर निकाल वेगळाच लागू शकला असता !

आपला खेळ पूर्ववत करण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, हे त्याचं त्याला शोधू द्या. तो सध्याच्या घडीला चतूर क्रिकेटपटूंपैकी एक आहे, आणि आपल्याला काय कारयचंय हे त्याला पक्क माहिती आहे. संघ म्हणून तो जी काही मेहनत घेतोय हे आम्ही पाहतोय आणि आम्हाला त्याच्यात आनंद आहे. विराट धोनीच्या खेळाबद्दल विचारलेल्या प्रश्नाबद्दल विचारत होता. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ५ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 8:36 pm

Web Title: no is more committed to indian cricket than dhoni says kohli
Next Stories
1 #IndvsAus: ‘तो नाही त्याची बॅटच बोलते’, मिम्सच्या माध्यमातून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव
2 भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले ‘हे’ खास ट्विट
3 IND vs AUS : ….तर निकाल वेगळाच लागू शकला असता !
Just Now!
X