आयसीसी महिला विश्वचषकाचा एकही सामना वानखेडे स्टेडियम आणि एमआयजी क्लबच्या मैदानावर होणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. ३१ जानेवारीला वानखेडे स्टेडियमवर विश्वचषकाचे शानदार उद्घाटन होणार होते. परंतु २६ ते ३० जानेवारी या कालावधीत वानखेडेवर मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे हे सामने वानखेडेवरून दुसरीकडे हलविण्यात येणार आहेत.
‘‘वानखेडे आणि एमआयजीवर महिला विश्वचषकाचा एकही सामना होणार नाही’’, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. या दोन मैदानांशिवाय ब्रेबॉर्न स्टेडियम, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीएचे मैदान आणि कटकमधील बाराबती स्टेडियमवर या ठिकाणी सामन्यांचा आधी कार्यक्रम होता. अ गटातील इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांचे सामने ब्रेबॉर्न आणि बीकेसीवर होणार आहेत. सामन्यांच्या या बदलासंदर्भात बीसीसीआय आणि आयसीसीडून अद्याप बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अधिकृत स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही