आयसीसी (ICC) ने नुकतेच २०१० ते २०२० या दशकातल्या सर्वोत्तम टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. या तिन्ही संघामध्ये पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलं नाही. ही पाकिस्तान क्रिकेटसाठी लाजीरवाणी बाब आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दशकातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यासाठी आयसीसीने एका पोलचं आयोजन केलं होतं. या पोलमध्ये मिळालेल्या मतांच्या आधारावर आयसीसीनं तिन्ही प्रकारच्या संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये पाकिस्तानधील एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलं नाही.

पाकिस्तानी चाहत्यांनी यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाला कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. यावरुनच त्यांनी आयसीसीवर नाराजीही व्यक्त केली आहे. शोएब मलिक, युनिस खान, मिसबाह उल हक, शाहिद आफ्रिदी आणि बाबर आजमसारखे खेळाडू असतानाही दशकातील सर्वोत्तम संघात एकाही खेळाडूची निवड न झाल्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या दबावाखाली आयसीसीनं संघाची निवड केल्याचा आरोप पाकिस्तानी चाहत्यांनी केला आहे. राशीद खान आणि जसप्रीत बुमराह यांनी गेल्या काही वर्षात पदार्पण केलं असतानाही दशकातील सर्वात्तम संघात त्यांची निवड कशी झाली? असा प्रश्नही चाहत्यांनी उपस्थित केला आहे.

एकदिवसीय आणि टी ३० संघाच्या कर्णधारपदी धोनीची निवड झाली आहे. तर कसोटी संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे आलं आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्थान मिळवणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. पाहा दशकातील सर्वोत्तम खेळाडू…

दशकातील सर्वोत्तम टी२० संघ –
रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ –
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा

कसोटी संघ –
अॅलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली(कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर. अश्विन, बेन्ट स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेस्म अँडरसन