News Flash

IND vs AUS : मोहाली, दिल्ली सामन्यांचं ठिकाण बदलणार नाही – बीसीसीआय

हंगामी अध्यक्ष सी.के.खन्ना यांचं स्पष्टीकरण

शनिवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 वन-डे सामन्यांची मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र सीमेवर भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावामुळे या मालिकेतील मोहाली आणि दिल्ली या अखेरच्या दोन सामन्यांची ठिकाणं बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दिल्ली आणि मोहाली सामन्यांची ठिकाणं बदलण्याचा बीसीसीआयचा कोणताही विचार नसल्याचं खन्ना यांनी स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – टीम इंडिया नवीन रुपात मैदानावर येणार, पाहा नव्या जर्सीचे फोटो…

10 मार्चरोजी मोहालीच्या मैदानात चौथा तर 13 मार्चरोजी दिल्लीत अखेरचा सामना रंगणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या दोन सामन्यांपैकी एक सामना आपल्या मैदानावर खेळवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र मालिकेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नसून, मोहाली आणि दिल्लीचे सामने ठरलेल्या वेळेनुसार पार पडतील. खन्ना पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

अवश्य वाचा – IND vs AUS : पहिल्या वन-डे सामन्याआधी भारताच्या गोटात चिंता, सरावादरम्यान धोनीला दुखापत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 8:43 pm

Web Title: no plans to shift odi matches from mohali and delhi says bcci acting president
टॅग : Bcci,Ind Vs Aus
Next Stories
1 टीम इंडिया नवीन रुपात मैदानावर येणार, पाहा नव्या जर्सीचे फोटो…
2 Welcome Home Abhinandan : अभिनंदन यांच्या शौयाला वीरेंद्र सेहवागचा सलाम
3 IND vs AUS : भारत-पाक तणावामुळे क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणांत बदल?
Just Now!
X