भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला सामना असणार आहे. आसामच्या बारपासरा क्रिकेट स्टेडीयममध्ये हा सामना रंगेल. या सामन्यासाठी स्टेडीयममध्ये कोणताही अनपेक्षित प्रसंग टाळण्यासाठी, पोस्टर – बॅनर नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवजीत सायका यांनी ही माहिती दिली.

अवश्य वाचा – Video : दुखापतीनंतर बुमराह सज्ज, भन्नाट यॉर्करने उडवला त्रिफळा

चौकार-षटकारासाठीचे फलक, मार्कर पेन इ. गोष्टींनाही मैदानात नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मात्र या सर्व गोष्टींचा नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन होत असलेल्या निदर्शनाशी काहीही संबंध नसल्याचं गुवाहटीचे पोलिस आयुक्त एम.पी. गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे. CAB च्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांमध्ये आसाममध्ये अनेक निदर्शनंही झाली होती.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन