News Flash

रणजी ट्रॉफीची ८७ वर्षांची परंपरा खंडीत… BCCI ला या कारणामुळे घ्यावा लागाला मोठा निर्णय

तब्बल ८७ वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे

भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कवली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज ४५ जार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे,

तब्बल ८७ वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. मात्र महिलांच्या क्रिकेट हंगामाला मार्चमध्ये प्रारंभ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. करोनाच्या साथीमुळे देशांतर्गत क्रिकेट हंगाम यंदा दिरंगाईने सुरू झाला आहे. सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. रणजी करंडक स्पर्धेबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु याबाबत योग्य तोडगा निघू शकला नाही. ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा रणजी स्पर्धेसाठी आग्रही होता. पण अखेर रणजी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात. देशातील सहा मुख्य शहरांमध्ये मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक पुढच्या आठवड्यात अंतिम करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 1:34 pm

Web Title: no ranji trophy in 2020 1 but bcci to hold domestic 50 ver games for men women and u 9 boys nck 90
Next Stories
1 IND vs ENG : कधी-कुठे कसे पाहता येणार सामने, जाणून घ्या सर्वकाही
2 कार्तिकचं तुफानी अर्धशतक, तामिळनाडू लागोपाठ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत
3 केदार देवधरचं तुफानी अर्धशतक; बडोद्याची फायनलमध्ये धडक
Just Now!
X