29 May 2020

News Flash

गोड-तेलकट पदार्थ खाणं टाळा, टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी संघाचा डाएट प्लान

भारतीय खेळाडूंच्या आहारावर तज्ज्ञांची देखरेख

२०२० साली जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाने कंबर कसली आहे. पात्रता फेरीत सर्वोत्तम कामगिरीसाठी हॉकी इंडियाने आपल्या महिला संघातील खेळाडूंसाठी एक डाएट प्लान आखून दिला आहे. यामध्ये खेळाडूंना गोड-तिखट आणि तेलकट पदार्थ टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिक पात्रता फेरी खेळणार आहे.

वेन लोम्बार्ड या प्रसिद्ध आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महिला हॉकीपटू आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर काम करत आहेत. संघातली प्रत्येक खेळाडू आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत आहे. मैदानात चांगली कामगिरी करण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही गोड पदार्थ-चॉकलेट, तेलकट पदार्थ व्यर्ज केले आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपालने माहिती दिली.

जपानमधील स्पर्धा जिंकल्यानंतर जेव्हा आम्ही भारतात आलो, तेव्हा मला आईच्या हातचे ‘राजमा-चावल’ खायची इच्छा झाली होती. अशावेळी लोम्बार्ड आम्हाला डाएट प्लानमधून सुट्टी घेण्याची सवलत देतात, मात्र ती सवलत एका दिवसापूरतीच असते. राणी आपल्या संघाच्या डाएट प्लानविषयी बोलत होती. भारतीय महिला हॉकी संघ १९८० साली झालेल्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला होता. ही भारतीय महिलांची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. २०१६ साली पार पडलेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघ पात्र ठरला होता, मात्र यासाठी त्यांना ३६ वर्ष वाट पहावी लागली होती. त्यामुळे यंदा भारतीय महिला संघ ऑलिम्पिकला पात्र ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2019 3:52 pm

Web Title: no spice and sweets hockey india strict diet plan for women hockey team ahead of 2020 tokyo olympic psd 91
Next Stories
1 जॉन्टी ऱ्होड्स टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत?
2 Video : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे तयार, जिममध्ये करतोय कसून मेहनत
3 आपलं कोण, परकं कोण?? एक पराभव तुम्हाला खूप शिकवतो – विराट कोहली
Just Now!
X