03 June 2020

News Flash

भारतात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन इतक्यात शक्य नाही – क्रीडामंत्री किरेन रिजीजू

नवीन नियमांची सवय करुन घ्यायला हवी !

संपूर्ण जगाला सध्या करोना विषाणूने विळखा घातलेला आहे. यामधून काही देश हळुहळु सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. जर्मनीने Bundesliga फुटबॉल लिगला मान्यता देत, पहिली महत्वाची क्रीडा स्पर्धा सुरु केली. भारतामध्येही ठप्प पडलेलं क्रीडा विश्व सुरु करण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मैदानं आणि Sports Complex सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र इकडे प्रेक्षकांना हजर राहता येणार नाहीये. भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेज रिजीजू यांनी येत्या काही काळात भारतात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

“गेले काही दिवस आम्ही देशात क्रीडा स्पर्धा कशा सुरु करता येतील याची तयारी करत होतो. मात्र सध्याच्या घडीला आपल्याला सरावापर्यंत मर्यादीत रहावं लागणार आहे. देशात लगेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन होईल अशी सध्याची स्थिती नाही. आपल्या सर्वांना नवीन नियमांची सवय करुन घ्यावी लागणार आहे. यापुढील सामने हे प्रेक्षकांविना रिकाम्या मैदानातच खेळवले जातील.” रिजीजू इंडिया टुडेशी बोलत होते. रिजीजू यांचं हे वक्तव्य वर्षाअखेरीस आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्याचा विचार करत असलेल्या बीसीसीआयसाठी महत्वाचं मानलं जात आहे.

देशात क्रीडा स्पर्धा सुरु करणं ही आमची जबाबदारी आहे. योग्य परिस्थिती पाहून तो निर्णय आम्ही घेऊ. पण फक्त आपल्याला क्रीडा सामने पहायचे आहेत यासाठी आरोग्य आणि इतरांचे जीव धोक्यात घालून चालणार नाही. करोनाशी लढताना आपल्याला क्रीडाविश्व पुन्हा एकदा मूळ पदावर कसं येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या परवानगी नंतर देशात काही क्रीडा संस्थांनी खेळाडूंना सरावाची परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात हे खेळाडू मैदानावर कधी उतरणार याबाबत अद्याप अनिश्चीतता कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 5:02 pm

Web Title: no sporting event in near future have to live with new normal of sports behind closed doors says kiren rijiju psd 91
Next Stories
1 विराट-विल्यमसन यांच्यात ‘या’ फोटोवरून रंगला मजेशीर संवाद
2 माणुसकी हाच मोठा धर्म ! यंदाची ईद साजरी न करता मजुरांना मदत करण्याचा सरफराजचा निर्णय
3 भर कार्यक्रमात गंभीर-एमएसके प्रसाद यांच्यात जुंपली…
Just Now!
X