24 November 2020

News Flash

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची बातमी निराधार – निवड समिती प्रमुख एम.एस.के.प्रसाद

सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीची चर्चा

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची बातमी चुकीची असल्याचं स्पष्टीकरण निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनी दिलं आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर करताना, ते पत्रकारांशी बोलत होते.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला २०१६ टी-२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचा संदर्भ होता. मात्र या फोटोमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली. मात्र धोनीच्या निवृत्तीबद्दल कोणतीही माहिती आमच्याकडे आली नसल्याचं सांगत ही बातमी खोटी असल्याचं प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – धोनीची निवृत्ती की आणखी काही?? विराटच्या एका ट्विटने रंगली नेटीझन्समध्ये चर्चा

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना लोकेश राहुलला डच्चू देत शुभमन गिलला भारतीय संघात स्थान दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 5:21 pm

Web Title: no update on ms dhonis retirement the news is incorrect says chief selector msk prasad psd 91
टॅग Ms Dhoni,Msk Prasad
Next Stories
1 Ind vs SA : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, लोकेश राहुलला डच्चू
2 पहिल्या अनौपचारिक कसोटीत भारत अ संघ विजयी, ७ गडी राखून आफ्रिकेवर मात
3 Pro Kabaddi 7 : केदार जाधवच्या हस्ते पुणेरी पलटणच्या घरच्या हंगामाचा श्रीगणेशा
Just Now!
X