News Flash

ना विराट, ना रोहित, ना धोनी… हा आहे सर्वात प्रभावशाली क्रिकेटर!

पाहा तुम्हाला पटतंय का 'हे' नाव

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सुमारे तीन महिन्यांपासून क्रीडा स्पर्धा बंद होत्या. आता हळूहळू विविध क्रीडास्पर्धा पुन्हा सुरू होऊ लागल्या आहेत. पण तरीदेखील क्रिकेटचा खेळ सध्या बंदच आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नुकताच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. इतर खेळाडू लाइव्ह व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. पण स्मिथने मात्र तसं न करता थेट इन्स्टा स्टोरीवर आपल्या चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली.

स्मिथच्या चाहत्या वर्गाने त्याला खूप सारे प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न होता की सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील तुला वाटणारा सर्वात प्रभावशाली खेळाडू कोण? या प्रश्नाचे उत्तर देताना स्मिथने कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या तिघांपैकी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्याने प्रभावशाली भारतीय खेळाडू म्हणून लोकेश राहुलचं नाव घेतलं. तसेच तो खूप चांगला खेळाडू आहे अशी त्याची स्तुतीदेखील केली.

याच प्रश्नोत्तरांच्या खेळात एका चाहत्याने स्मिथला विराट कोहलीचं एका शब्दात वर्णन काय करशील? असा सवाल केला. त्यावर स्मिथने त्याच्यासाठी ‘freak’ म्हणजेच विलक्षण खेळाडू असा शब्द वापरला. भारतीय संघाने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला साखळी फेरीत धूळ चारली होती. या सामन्यात भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली होती. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला आवडला नव्हता. त्यावेळी त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले होते. इतकंच नव्हे, तर त्याने स्मिथसाठी टाळ्या वाजवा असंही प्रेक्षकांना सांगितलं होतं. त्यानंतर स्मिथने कोहलीला हात मिळवून धन्यवाद दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 7:05 pm

Web Title: no virat kohli no rohit sharma no ms dhoni steve smith names kl rahul the most impressive player from team india vjb 91
Next Stories
1 ‘तो’ भारत दौरा कायम लक्षात राहिला – वसिम अक्रम
2 IPL 2020 ची तारीख ठरली? या महिन्यात रंगणार थरार
3 ‘सतत सुशांतबद्दलच विचार करतोय’; शेन वॉटसनही गहिवरला…
Just Now!
X