News Flash

IND vs ENG: ना विराट, ना रोहित… ‘हा’ परदेशी फलंदाज मोडेल सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम!

महान क्रिकेटपटू जेफरी बॉयकॉट यांचं मत

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने आपल्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले. धावांचा डोंगर उभारत त्याने जगात भारताचा झेंडा डौलाने फडकवला. कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने सर्वाधिक २०० सामने खेळले. त्यात सचिनने ३२९ डावांत ५४च्या सरासरीने एकूण १५ हजार ९२१ धावा केल्या. कसोटी कारकिर्दीत सचिनने ५१ शतकं आणि ६८ अर्धशतके ठोकली. नाबाद २४८ ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ठरली. सचिनने कसोटीत जेवढ्या केल्या त्या उंचीपर्यंत पोहोचणं हे प्रत्येक फलंदाजासाठी एक स्वप्नच आहे. पण इंग्लंडचे महान क्रिकेटपटू जेफरी बॉयकॉट यांच्या मते भारताबाहेरील एक फलंदाज हा विक्रम मोडण्यास सक्षम आहे.

IND vs ENG: …तर अर्धी मिशी उडवून मैदानात खेळायला उतरेन- रविचंद्रन अश्विन

“इंग्लंडकडून डेव्हिड गोव्हर, केविन पीटरसन किंवा मी सर्वाधिक कसोटी धावा केल्या. पण ते सगळं विसरून जा. जो रूटमध्ये जगात सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. रूट दोनशेहून अधिक कसोटी खेळू शकतो आणि सचिनपेक्षा जास्त कसोटी धावा करू शकतो असा मला विश्वास आहे. रूट आता केवळ ३० वर्षांचा आहे. त्याने ९९ कसोटी सामने खेळले असून ८ हजार २४९ धावा केल्या आहेत. जो रूटला जर दुर्दैवाने फारच गंभीर प्रकारची दुखापत झाली तर तो क्रिकेटपासून दूर जाऊ शकतो. पण सुदैवाने तसं काहीही घडलं नाही तर तो सचिनचा १५ हजार ९२१ कसोटी धावांचा विक्रम नक्कीच मोडेल”, असं मत बॉयकॉट यांनी आपल्या ‘द टेलिग्राफ’मधील स्तंभात व्यक्त केलं.

सेहवागने शेअर केला भन्नाट VIDEO; म्हणाला, “बिवी की लाठी…”

“सध्याच्या घडीचे महान फलंदाज विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्यासोबत रूटचं नाव घेतलं जातं. हे सारे अतिशय प्रतिभावान खेळाडू आहेत. या साऱ्यांमध्येही सर्वाधिक धावा करण्याची क्षमता आहे. पण सध्या तरी आपण या साऱ्या खेळाडूंसोबतच रूटची तुलना करायला हवी आणि त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटायला हवा. रूटच्या खेळाची तुलना निवृत्त झालेल्या खेळाडूंच्या खेळाशी करणं चुकीचं ठरेल. कारण प्रत्येकाच्या वेळी खेळाची परिस्थिती वेगळी होती”, असंही बॉयकॉट यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 1:21 pm

Web Title: no virat kohli rohit sharma but joe root can break sachin tendulkar record of most test runs ind vs eng vjb 91
Next Stories
1 भारतीय महिला हॉकी संघ अर्जेटिनाकडून पराभूत
2 कसोटी मालिकेत इंग्लंडचे निर्भेळ यश
3 स्वत:ला सिद्ध केल्याचे समाधान!
Just Now!
X