News Flash

उत्तर कोरियाची ऑलिम्पिकमधून माघार

उत्तर कोरियाच्या या निर्णयावर दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने नाराजी दर्शवली आहे

(संग्रहित छायाचित्र)

करोना विषाणू संसर्गामुळे उत्तर कोरियाने आगामी टोक्यो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. २५ मार्च रोजी राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या झालेल्या बैठकीत खेळाडूंना करोनापासून वाचवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उत्तर कोरिया क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

उत्तर कोरियाच्या या निर्णयावर दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने नाराजी दर्शवली आहे. त्याचबरोबर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरच आपण प्रतिक्रिया देऊ, असे जपानच्या ऑलिम्पिक मंत्री तामायो मारुकाव्हा यांनी म्हटले आहे. आपण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही, असे उत्तर कोरियाने अधिकृतपणे आम्हाला कळवलेले नाही, असे जपानच्या ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे.

दक्षिण कोरियात २०१८मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी उत्तर कोरियाने २२ जणांचा संघ पाठवला होता. आपण टोक्यो ऑलिम्पिकसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन तसेच उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन आणि त्यांची बहीण किम यो जाँग यांना आमंत्रित करणार असल्याचे जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी म्हटले होते. मात्र त्यांना ऑलिम्पिकचे निमंत्रण पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला सुगा यांनी दुजोरा दिलेला नाही.

वॉटरपोलो स्पर्धा रद्द

या आठवड्यात होणारी वॉटरपोलो स्पर्धा टोक्यो ऑलिम्पिकच्या संयोजकांनी रद्द केली आहे. मात्र संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. कडक निर्बंधांमुळे तांत्रिक अधिकाऱ्यांना जपानमध्ये दाखल होता येत नाही, अशी चर्चा आहे. टोक्योमध्ये १८ ते २३ एप्रिलदरम्यान डायव्हिंग विश्वचषक आणि १ ते ४ मेदरम्यान रंगणारी कलात्मक जलतरण स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 12:10 am

Web Title: north korea withdraws from olympics abn 97
Next Stories
1 VIDEO : राजस्थानच्या फलंदाजाचा ‘लेकी’सोबत सुंदर वर्कआऊट!
2 मोईन अलीबद्दलच्या ‘त्या’ ट्विटवरून तस्लिमा नासरीन यांच्यावर भडकला जोफ्रा आर्चर!
3 उत्तर कोरियाची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार
Just Now!
X