23 November 2017

News Flash

‘त्याला’ फेडररवर भरवसा होता ना! ३६ लाखांची पैज जिंकली

फेडररच्या विजयाने 'तो' चाहता झाला कोट्यधीश!

ऑनलाइन टीम | Updated: July 16, 2017 10:05 PM

रॉजर फेडरर

‘ग्रासकोर्टच्या बादशाह’ अर्थात रॉजर फेडररच्या ऐतिहासिक विजयानंतर त्याचा एक चाहता लखपती झाला आहे. रॉजर फेडरर मैदानात उतरण्यापूर्वी या चाहत्याने तब्बल  लाखांची पैज लावली होती. लाखो चाहत्यांची अपेक्षा फेडरर यावेळी पूर्ण करेल, असा विश्वास असल्यामुळे त्याने लाखो रुपयांची जोखीम घेतली. लंडनमधील एका कंपनीच्या प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या जॉर्ज नावाच्या ३६ वर्षीय व्यक्तिने फेडरर जिंकणार असे सांगत तब्बल ३६ लाखांची पैज लावली. विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात फेडरर पराभूत झाला असता तर त्याला ३६ लाखावर पाणी सोडावे लागणार होते. याउलट फेडरर जिंकला तर त्याला तब्बल १ कोटीहून अधिक रक्कम मिळणार होती.

लंडनमधील ‘टेलिग्राफ’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, जॉर्जची एक प्रेयसी देखील आहे. तिला टेनिसमध्ये फारसा रस नाही. त्यामुळे हा मोठा निर्णय घेताना त्याने याबाबत कोणतीही माहिती तिला दिली नव्हती. याशिवाय जॉर्जने आत्मविश्वास असल्याशिवाय पैज लावत नसल्याचे देखील सांगितले होते. तो म्हणाला की, मी अधिक प्रमाणात पैज लावत नाही. पण ज्यावेळी मी पैज लावतो ती जिंकण्यासाठीच असते. विम्बल्डनमध्ये सुरुवातीपासून फेडरर लयात खेळत असल्याचे दिसले. त्यामुळे तो यंदा विम्बल्डनवर कब्जा करेल, याची खात्री निर्माण झाली. ज्यावेळी मित्र मंडळीमध्ये विम्बल्डनसंदर्भातील विजेता कोण होईल, याविषयी चर्चा रंगली त्यावेळी मी फेडररला पसंती दिली.

फेडररने आठव्यांदा विम्बल्डनची स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच्या या विजयानंतर पैजेची रक्कम किती कालावधीत मिळणार याबाबत जॉर्जने माहिती दिलेली नसली तरी सामन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीप्रमाणे फेडररच्या विजयाने तो ही पैज जिंकला आहे.

First Published on July 16, 2017 10:03 pm

Web Title: north london man bets 50000 on roger federers wimbledon 2017 victory