News Flash

पुढच्या मालिकेत संधी मिळेल का याची चिंता आता मी करत नाही – लोकेश राहुल

अंतिम सामन्यात लोकेश राहुलचं अर्धशतक

वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ करत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. सलामीवीर लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज अर्धशतकं झळकावली. शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर लोकेश राहुलला सलामीला येण्याची संधी मिळाली. राहुलनेही आपल्या या संधीचा पुरेपूर फायदा उचलत ९१ धावा केल्या. काही महिन्यांपूर्वी खराब कामगिरीमुळे राहुलला आपलं कसोटी संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. मात्र आता आपण पुढील मालिकेत संधी मिळेल का याची चिंता करत नसल्याचं राहुलने स्पष्ट केलं आहे.

“संघातून बाहेर गेल्यानंतर काहीच वाटत नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. संघात संधी मिळणं आणि मग स्थान गमावणं हे एका खेळाडूसाठी कधीच सोपं नसतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दडपण सांभाळण्यासाठी थोडा कालावधी जावाच लागतो. यापुढे माझं संघातलं स्थान कायम राहिलं अशी मी फक्त आशा करु शकतो. ज्या-ज्या वेळी मला संधी मिळेल त्यावेळी चांगली कामगिरी करत राहणं हे माझ्या हाती आहे. आता मी माझ्या कारकिर्दीत अशा टप्प्यात आहे की पुढील मालिकेत मला संधी मिळेल की नाही याची चिंता मी करत नाही. कोणत्याही स्थानावर खेळायची संधी मिळो, सतत चांगली कामगिरी करत विजय मिळवून देणं हेच माझं उद्दीष्ट आहे”, लोकेश राहुलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहित-राहुलच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी बरोबरी

भारताला विजय मिळवून देण्यात लोकेश राहुलचा सिंहाचा वाटा होता. त्याने केवळ ५६ चेंडूत धडाकेबाज ९१ धावांची खेळी केली. त्यात त्याने ९ चौकार आणि ४ षटकार खेचले. सामन्यानंतर या खेळीबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, “इतिहासात प्रथम फलंदाजी करताना आमची (भारतीय संघाची) कामगिरी फारशी चांगली नाही. आकडेवारी पाहिली तर कोणीही ते सांगू शकेल. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला. निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी आम्हाला मिळाली आणि त्याचा आम्ही पूरेपूर लाभ घेतला. आगामी टी २० क्रिकेट मालिकांसाठी ही कामगिरी आमचा विश्वास दुणावणारी आहे,” असे राहुल म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:37 pm

Web Title: not at stage where i am worried whether i will play next tournament says kl rahul psd 91
टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 वेस्ट इंडिजची धुलाई करणारा राहुल म्हणतो…
2 BLOG : ऋषभ पंतसाठी उरलाय केवळ एकमेव पर्याय, सक्तीची विश्रांती !
3 …म्हणून वेस्ट इंडिजला हरवलं – विराट
Just Now!
X