04 March 2021

News Flash

पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर दादा म्हणतोय…

चहल, शामी आणि भज्जीनंतर दादाने व्यक्त केले मत....

जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी CRPF जवानांवर केलेल्या हल्याने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. या हल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेट विश्वकरंडकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचाहत्यांनीही पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याची मागणी केली आहे.

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानशी क्रिकेटच नव्हे, तर कोणताच खेळ खेळला जाऊ नये, अशा शब्दांत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानशी गटातील सामना न खेळल्याने भारताचे आव्हान संपुष्टात येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानसमवेत सामना खेळू नये, या हरभजन सिंगच्या मताशी सहमत असल्याचे गांगुलीने नमूद केले. पाकिस्तानला आपण काही सज्जड संदेश देणे अत्यावश्यक असल्याचे मतदेखील गांगुली याने व्यक्त केले.

भारतीय संघाशिवाय विश्वचषकात जाणे आयसीसीला कठीण जाणार आहे. पण, भारतामध्ये आयसीसी विश्वचषकात सहभागी न होण्याची ताकद आहे का? हे पाहणे पण औत्सुक्याचे ठरणार आहे. पण माझे वैयक्तिक असे मत आहे की, भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबध तोडले पाहिजेत. भारतीय लोकांनी व्यक्त केलेली मते योग्यच आहे. अशा भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही. क्रिकेटच नव्हे तर हॉकी, फुटबॉल आणि इतर खेळांमध्ये भारताने पाकिस्तानविरोधात खेळणं टाळले पाहिजे अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 7:31 am

Web Title: not just cricket cut off all sporting ties with pakistan sourav ganguly
Next Stories
1 गेलने मोडला आफ्रिदीचा विक्रम, झाला षटकारांचा बादशाह
2 कबड्डीपटूंच्या मनमर्जीमुळे संघनिवडीसाठी दिरंगाई!
3 ऑलिम्पिक पात्रतेसाठी प्रणवचे तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित
Just Now!
X